तुमच्या गावच्या ग्रामपंचायत ने किती आणि कुठे खर्च केला ते पहा.

Grampanchayat karbhar :

मित्रांनो. गाव पातळीवर जास्त करून, पानंद रस्ते, घंटागाडी, रोड लाईट, कामगार वर्ग, अशा बऱ्याच कामांवर ग्रामपंचायत खर्च करीत असते. तर तुमच्या गावातील ग्रामपंचायत ने कुठे खर्च केला. ते पाहूयात खालील प्रमाणे, तुम्हाला ग्रामपंचायत बद्दल माहिती असेलच, जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिका, शहरात नगरपालिका, नगरपरिषद, व गाव-खेडेगाव या ठिकाणी ग्राम पंचायत कारभार पाहत असते.

ई-ग्रामस्वराज :

राज्य शासनाने ग्रामपंचायत बद्दल माहिती देणारे, ऑनलाइन पोर्टल म्हणजे ई-ग्राम स्वराज हे होय. या पोर्टल वर जाऊन तुम्ही ग्रामपंचायत बद्दल खर्चाची माहिती चेक करू शकता.

योजनांवर केलेला खर्च अहवाल :

तुमच्या गावात राबवल्या जाणाऱ्या, नव-नवीन शासनाच्या योजना असतात. हा अहवाल प्रत्येक योजनेवर झालेल्या खर्चाचा तपशील असतो. तो कामाचा प्रगतीचा संसाधन वाटपाचा मागवा मदत होते.

पंचायत वार केलेला खर्च अहवाल:

तुमच्या ग्रामपंचायतीने केलेल्या, एकूण खर्चाची माहिती हा अहवाल दाखवीतो. आर्थिक वर्ष व खर्चाच्या प्रकारानुसार नवीन किंवा देखभालीची कामे असे, वर्गीकरण हा अहवाल करतो. ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आणि इतर विकास कामे इत्यादी विशिष्ट नागरिक माहिती पाहू शकतात.

टक्केवारी वर खर्च अहवाल :

हा अहवाल मूलभूत सुविधा दृष्टिकोन देतो. सामाजिक कल्याण, पायाभूत सुविधा इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी किती टक्के निधी खर्च झाला आहे. ते दाखवतो.

माहितीचा अधिकार कायदा RTI:

ग्रामपंचायत मार्फत झालेली कामे नागरिक माहितीचा अधिकार कायदा आरटीआय ची, मदत घेऊन पंचायतीकडून थेट माहिती मागण्याचा अधिकार देते. दिलेल्या कंत्राटी किंवा प्रविष्ट प्रकल्पासाठी निधी, वापरावर तपशील मागवणारा आरटीआय RTI अर्ज दाखल करू शकतात.

ग्रामसभा बैठका :

ग्रामसभा बैठक हे ग्रामपंचायत येथील, निर्णय घेणारी माहिती पूर्ण राहण्यासाठी त्यात सहभागी होणे महत्त्वाचे आहे. ग्रामसभा मध्ये पंचायत आपले वार्षिक बजेट सादर करीत असते. व त्यावर येणारा योजनेचा खर्च यावर चर्चा करते. नागरिकांनी यामध्ये सक्रियपणे भाग घेऊन. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारून निधी कसा वापरला जाणार याबद्दल तुमचे तळमळ, चिंता तुम्ही मांडू शकता.

सार्वजनिक नोटीस बोर्ड :

ग्रामपंचायत त्यांना महत्त्वाची माहिती सार्वजनिक नोटीस बोर्डवर प्रदर्शित करणे, बंधनकारक असते. यामध्ये मोठ्या प्रकल्पांसाठीचा खर्चाचा तपशील, टेंडर दस्तावेज व लेखापरीक्षण अहवाल यांचा समावेश होतो. आद्य्तनांसाठी या बोर्ड नियमितपणे तपासण्याची सवय करा. नागरिकांनी त्यांच्या रोजच्या नियमित सवयींमध्ये, ही पण सवय लावून घेणे गरजेचे आहे.

सार्वजनिक सामाजिक लेखापरीक्षण :

या लेखापरीक्षणामध्ये गावातील नागरिक व पंचायतीच्या आर्थिक रेकॉर्ड व प्रकल्प यांची अंमलबजावणीची तपासणी करतात. अशा लेखापरीक्षणाअंतर्गत भाग घेऊन तुम्ही निधीचा योग्य वापर केला जात आहे. किंवा नाही. हे थेट बघू शकता तपासू शकता. व तुम्हाला जो गैरसमज तुमच्यासमोर असेल तर तो मुद्दा उपस्थित करू शकता.

पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा :

 • ग्रामपंचायत विषयी सर्व कागदपत्रे व दस्ताऐवज यांच्या प्रति झेरॉक्स स्वरूपात तुमच्याजवळ ठेवा.
 • तुम्ही जी माहिती घेऊन, मागणी स्पष्ट आणि नीटनेटकेपणा असावा.
 • तुम्ही एखाद्या योजनेबद्दल माहिती घेऊन, तुमचे निष्कर्ष गावातील लोकांबरोबर चर्चा करून, व पारदर्शकतेसाठी सामूहिक कृतीला प्रोत्साहन करा.

ग्रामपंचायत ला उत्पन्नाचे साधन :

 • ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवर ग्रामपंचायत कर आकारते.
 • जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून ग्रामपंचायतला मिळणारे अनुदान.
 • व्यवसाय कर, जनावरांच्या खरेदी-विक्री वरील कर, यात्रा कर.
 • जिल्हा परिषद करून विकास कामांसाठी मिळणारे अनुदान.

ग्रामपंचायतीची कामे पुढीलप्रमाणे:

 • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, गावात नवीन रस्ते बांधणे, रोडलाईटचे सोय करणे
 • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, शेती विकासाच्या व पशुधन सुधारण्यासाठी योजना अमलात आणणे, गावांमध्ये उत्सव जत्रा, यात्रा बाजार, यांची व्यवस्था करणे.

सरपंचाचे अधिकार व कार्य :

 1. गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे.
 2. मासिक सभा बोलावणे.
 3. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे.
 4. नवीन योजनांसाठी पंचायत समितीची मंजुरी घेणे.
 5. ग्रामपंचायत मधील दस्तऐवज सुरक्षित ठेवणे.

ग्रामपंचायत मध्ये प्रामुख्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक हेच कामकाज पाहत असतात. भारताच्या घटनेमध्ये पंचायत राज मधील सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे ग्रामपंचायत होय. एक मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. निर्मितीच्या आधी 1958 मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची, स्थापना करण्यात आली होती. पुढे असा नियम केला की गावांची लोकसंख्या 600 पेक्षा जास्त असेल तर, त्या गावांमध्ये ग्रामपंचायत स्थापन केले जाऊ शकते. ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो.

आपल्याला या ग्रुप वर बघायला मिळतिल. तसेच शासन निर्णय शेती विषयक माहिती, बातम्या, चालू घडामोडी, सोन्याचा चड-उतार अशाच प्रकारे शेतीविषयक सल्ला, प्रगत शेती कायदे, उपाय नवनवीन तंत्रज्ञाने हे सर्व तुम्हाला या ग्रुप वर भेटेल. 

 

Leave a Comment