मुख्यमंत्री सहाय्यता निधी कसा मिळणार?

माझ्या शेतकरी मित्रांनो, व नागरिकांनो, आज आपण एक महत्त्वाची अशी राज्य शासनाची योजना पाहणार आहोत. याचं नाव आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, तर राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांना, व दुर्बल आजारांवर उपचार करत असलेल्या, नागरिकांना त्याचबरोबर, आर्थिक सबलता नसलेल्या, नागरिकांना व राज्यातील समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना, या मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेतून, या सर्व आजारांवरती उपचार करण्यासाठी, निधी दिला जातो. अनुदान दिले जाते. व याच्या अंतर्गत पाठीमागच्या 1 वर्षांमध्ये जवळपास 10 हजार 500500 यापेक्षा जास्त नागरिकांनी या योजनेतून जवळपास 1000 कोटी पेक्षा जास्त अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

व तसेच, या योजनेचे अधिक व्यक्ती वाढावी. या कारणाने रुग्णांना याचा अर्ज उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी 8650567567 हा नंबर देण्यात आलेला आहे. या नंबरला कॉल केल्यावर लगेच एक एसएमएस द्वारे लिंक पाठवली जाईल. या मार्फत रुग्णांना अर्ज डाऊनलोड करता येणार आहे. व त्याचबरोबर आपल्याला व्हाट्सअप द्वारे, हे या योजनेची माहिती घेता येणार आहे. यासाठी सुद्धा 8650567567 हाच नंबर आहे. याच्यावर हाय HI म्हणून मेसेज केल्यानंतर आपल्याला काही माहिती पाठवली जाईल. यामध्ये प्रथम आपली भाषा निवडायची व नंतर पुढे तीन पर्याय दिले जातील. व त्याचबरोबर, अर्जाची स्थिती ही नागरिकांच्या आजाराची माहिती व नोंदणीकृत जे काही शासनाने रुग्णालय यादीमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये, आपण अर्ज केला असेल, तर त्या अर्जाची स्थिती आपण ऑनलाइन देखील बघू शकता. व त्या आजाराविषयीची माहिती तुम्हाला असेल, तर त्याच्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या, आजारांवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी द्वारे मदत दिली जाते. त्या पर्यायावर क्लिक करायचं आणि नोंदणीकृत रुग्णालयाची माहिती पाहिजे असेल तर यादी वरती क्लिक करायचा आहे.

त्याचबरोबर, हॉस्पिटलचा खर्च परवडण्यासाठी, अशा कुटुंबांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा दिला जाणार आहे. विविध शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाईल. संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे फडणवीस सरकारने वैद्यकीय सहाय्य क कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच अनेक नवनवीन आजारांवर अर्थसहाय्य केले जाईल.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळणारे आजारांची नावे :

 • हृदय प्रत्यारोपण
 • यकृत प्रत्यारोपण
 • हृदयरोग
 • लहान बालकांचे शस्त्रक्रिया
 • अपघात
 • कर्करोग
 • डायलिसिस
 • गुडघ्याचे प्रत्यारोपण
 • रुग्ण नवजात शुशेंचे आजार
 • मेंदूचा आजार
 • विद्युत अपघात रुग्ण
 • हाताचे प्रत्यारोपण
 • हीप रिप्लेसमेंट
 • कर्करोग शस्त्रक्रिया
 • फोकस प्रत्यारोपण
 • किडनी प्रत्यारोपण

आपल्याला अँड्रॉइड एप्लीकेशन च्या मदतीने सुद्धा आपण फोर्म भरू शकता. त्याची लिंक पुढे दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही डाऊनलोड करू शकता. एप्लीकेशन डाउनलोड करून नंतर पुढे एक तुम्हाला पेज दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मुख्यमंत्री सहायता निधी आणि व्हाट्सअप हेल्पलाइन अशा प्रकारे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. एप्लीकेशन वरून सुद्धा तुम्ही अर्ज डाऊनलोड करू शकता. मित्रांनो यामध्ये तुम्हाला सामान्य प्रश्न काय असतील तर हॉस्पिटल शोधणे, वैद्यकीय अर्ज अशा प्रकारची सर्व माहिती या ॲप्लिकेशनद्वारे मिळेल.

मुख्यमंत्री साहेबांनी ते योजना अंतर्गत आर्थिक उत्पन्न व अशा व्यक्तीला ज्याला हृदयविकार कॅन्सर अपघात गुडघा प्रत्यारोपण खुबा प्रत्यारोपण असे बरेच आजार विकार असतील तर अशा, शस्त्रक्रिया व उपचार यावर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व त्याचबरोबर, शासनाचीच राष्ट्रीय बल स्वस्त कार्यक्रम, व चारित्र्य योजना या योजना तीनही यांचा लाभ न मिळू शकणाऱ्या, नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये, उपचार घेणाऱ्या सर्व गरजू नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय तपासून अर्थसहाय्य दिले जाते. यामुळे महत्वाची योजना आहे.

राज्यातील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकार कल्याणकारी विविध, प्रकारच्या योजना राबवत असते. हल्लीच्या काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात बाहेर गेला आहे. व आशा मध्ये महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी, ही एक महत्त्वपूर्ण योजना चालू केली आहे. व मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेमधून, सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया व त्याचबरोबर, उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एका विशिष्ट रकमेचे नागरिकांना मदत केली जाते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर, असे घटक या योजनेअंतर्गत अर्थसाह्य मिळवण्यासाठी पात्र असणार आहेत.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या योजनेअंतर्गत नागरिकांना वेगवेगळ्या आजारांवर व शस्त्रक्रियांवर निधी दिला जाणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, चारिटी योजना, राष्ट्रीय बाल संस्था कार्यक्रम या तिन्ही उपचारांसाठी रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

 • रुग्णाचे आधार कार्ड
 • रेशन कार्ड संबंधित आजाराचे रिपोर्ट
 • रुग्णालयाचे नोंद अपघात असल्यास एफ आय आर
 • अर्ज
 • तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (1.60 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे)

या योजनेचे कार्यवाही पुढील प्रमाणे करावी :

व त्याचबरोबर, रुग्णालयाच्या लेटर वर जो काही रुग्णालयाचा खर्च झालेला आहे. त्या खर्चाची मूळ प्रत व प्रमाणपत्र आपल्याला रुग्णालयाकडून घ्यायचा आहे. त्याचबरोबर, जर का लाभार्थ्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असतील. तर नागरिकांचा खर्च व त्यावर उपचाराचा खर्च हा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या प्रमाणपत्रावर लाभार्थ्याला शासकीय रुग्णालयातील, जिल्हा शल्य चिकित्सक या डॉक्टरांचा सही शिक्का घ्यायचा आहे. व त्याचप्रमाणे त्या प्रमाणपत्रांमध्ये सुद्धा, त्या रुग्णाने राजीव गांधी जीवनदायी ने योजने तर्फे, याआधी कोणताही लाभ हा घेतलेला नसावा.

लाभार्थ्याने स्वतः रुग्णालयाकडून अजून एक पत्र घ्यायचे आहे. ते म्हणजे रुग्णालयाच्या लेटरहेडवर त्या रुग्णालयाचे बँक अकाउंट व आयएफएससी कोड, हॉस्पिटलच्या ईमेल आयडी हा तपशील त्यामध्ये नमूद करायचा आहे. तर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेचे अकाउंट लयाच्या नावावर असावे. त्याशिवाय इतर कोणत्याही, अकाउंट वर मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा दिला जाणार नाही.

आपण, त्या अपघातावर जर उपचार घेत असाल, तर अशा अपघाताबद्दल जवळच्या पोलीस स्थानकामध्ये लाभार्थ्याने एफ आय आर अर्थात, तक्रार प्रत जोडणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्याचे किडणे, किंवा लिव्हर ट्रान्स प्लांट च्या मॅटरमध्ये रुग्णालयाची कमिटी, ही रिपोर्ट देत असते तो रिपोर्ट यामध्ये जोडावा लागेल.

त्याचप्रमाणे, जवळपास काही प्रमाणपत्र यांचे नमुने आपण वरती बघितलेले आहेत. तर त्या रुग्णालयामध्ये जाऊन हे नमुना प्रमाणपत्र तुम्ही, त्यांना दाखवू शकता. व त्यांना असेही सांगू शकता. की अशा प्रकारचे प्रमाणपत्र आपल्या रुग्णालयाकडून आम्हाला हवे आहेत.

राजकीय नेतेमंडळी म्हणजेच, आमदार व खासदार यांची शिफारस देखील, तुम्ही घेऊ शकता. जर आपल्याला अशी शिफारस मिळत नाही. तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. कारण हे गोष्ट त्यांना बंधनकारक नाहीये. या सर्व अर्थशाही मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात पहिला भाग म्हणजेच, ही सर्व कागदपत्रे जमा करून, आपण ऑनलाइन अर्ज कसा भरतो ते पाहुयात.

 • सर्वात पहिलं लाभार्थ्यांनी राज्य शासनाच्या पोर्टलवर जाऊन, ऑनलाईन अर्ज करावा. समोर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. तो फॉर्म सोप्या पद्धतीचा आहे. आणि तो सहजरित्या तुम्ही भरू शकता. त्याचप्रमाणे, त्या फॉर्ममध्ये आपण जमा केलेले आवश्यक ते कागदपत्रे सगळे जोडावी.
 • आता आपला अर्ज हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला सादर होत आहे. असे दिसेल व तो अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला, दोन पद्धती आहेत एक म्हणजे पोस्टाने तुम्ही पाठवू शकता. व दुसरा म्हणजे तुम्ही थेट अर्ज देऊ शकता.
 • त्यांना तर आपण थेट जाऊन, हा अर्ज जमा करणार आहे. तर तुम्हाला शासनाच्या मंत्रालयामध्ये जाऊन सातव्या मजल्यावर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, या पक्षाचे कार्यालयाची सुविधा तुम्हाला, तेथे मिळेल. तर पोस्टाने जर तुम्ही अर्ज पाठवायचा असेल.
 • तर तुम्हाला त्या कार्यालयाचा पत्ता आम्ही खालील प्रमाणे, दिला आहे. “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सातवा मजला मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुख्य इमारत” मुंबई 400032 या पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता.

तुम्ही अर्ज जमा केल्यावर, तो अर्ज पडताळला जातो व त्यासोबत ची, सर्व माहिती ही शासनाद्वारे तपासली जाते. व तुम्ही दिलेली सर्व माहिती जर बरोबर असेल, तर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट वर पैसे पाठविले जातात. तसेच पैसे पाठविल्याचे पत्र हे रुग्णालयांमध्ये व एक पत्र अर्जदाराला पाठविले जाते. त्याचप्रमाणे, तुम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती मिळाली असेल. समजले असेल अशा प्रकारे, तुम्ही मुख्यमंत्र सहाय्यता निधी मधून अर्थसाह्य हे मिळू शकतात.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे, तुम्ही वरील सर्व माहिती तंतोतंत भरल्यानंतर, व ती सादर केल्यानंतर तुम्हाला शासनाद्वारे, पत्र मिळून जाईल व त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी, सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता. व तुमचे स्टेटस किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी याचे अपडेट, तुम्ही त्या शासनाच्या पोर्टलवर जाऊन चेक करू शकतात. त्याबाबतची लिंक तुम्हाला खाली दिलेले आहे.

https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action

अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळण्यासाठी तुम्हाला आमच्याशी कनेक्ट रहावे लागेल. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या माहितीवर व लोगोवर क्लिक करा व आमच्याशी कनेक्ट राहा. या योजनेबद्दलची, अजून अपडेट आल्यास आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईट द्वारे कळवू.

शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. वेगवेगळ्या हंगामातील पीक मार्गदर्शन व फळबाग पिके हे सर्व आमच्या ग्रुप वर कृषीविद्यावर बघायला मिळेल.

Leave a Comment