मागेल त्याला सौर कृषी पंप शासनाने केली मोठी घोषणा. काय आहे योजना. पाहा.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 :

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे असे बातमी घेऊन आलो आहे. राज्यातील सुमारे 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना कृषी सौर पंपाचे वितरण केले जाणार आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी रोजी विधानसभेमध्ये दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. तर या योजने संदर्भात जवळपास 1 लाख कृषी पंप हे पीएम कुसुम योजना अंतर्गत राज्यात वितरित करण्याचे उद्दिष्ट नियोजित आहे. तर यापैकी राज्यात 78 हजार 757 कृषी पंप बसवण्यात यशस्वी झाले आहेत. याबाबतची माहिती विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच अपारंपारिक ऊर्जेचा वापर करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रामध्ये तब्बल 40% नियोजित वापर करण्याचां शासनाचा मानस आहे.

तसेच, केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे केंद्रात व महाराष्ट्र राज्यात रूफ टॉप सोलर ही योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून जवळपास 78 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिली. व त्याचबरोबर सर्व योजनांसाठी सौर ऊर्जा करण करण्यासाठी, येत्या 2 वर्षांमध्ये या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे, हे आश्वासन उपमख्यमंत्री,अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखीन एक योजनेसाठी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी अनुदान मिळणार आहे. असेही सभागृहात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Magel tyala saur krushi pump :

त्याचप्रमाणे, राज्यातील महत्त्वाचे गडकिल्ल्यांपैकी 11 गड किल्ले यांना जागतिक वारसा स्थळ म्हणजेच हेरिटेज दर्जा देण्यासाठी जाहीर करण्याचा प्रस्ताव देखील, शासनाने युनेस्कोला पाठवून दिलेला आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परळी, परभणी या अंतर्गत जिरेवडी सोयाबीन प्रक्रिया उपकेंद्र कृषी व्यवस्थापन विद्यालय व कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे सभागृहात सांगितले त्याचप्रमाणे राज्याला प्रगतीच्या मार्गाने पर्यटनाला चालना देण्यासाठी एक धोरण आखणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जुन्नर मध्ये भव्य शिवसंग्रहालय उभारण्यात येईल असेही त्यावेळी, बोलताना सांगितले शासनाने त्यासाठी 8 हजार 616 कोटी रुपये सेवा व वस्तू कर राज्य शासनाला दिले आहेत.

त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री ग्रामसडक या योजनेअंतर्गत दुसरा टप्पा आराखड्यात केला आहे. व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जवळपास 7 हजार 600 कोटी रुपये इतका खर्च नियोजित करण्यात आला आहे. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग साठी भूसंपादन चालू असल्याचे देखील सांगितले. राज्यातील एक जिल्हा एक उत्पादन या योजनेअंतर्गत, नवी मुंबईतील युनिटी मॉल साठी जवळपास 996 कोटी रुपये च्या कामाची निविदा काढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी शिधापत्रिकेवर एक साडीचे वितरण देखील करण्यात येणार, असल्याचे अजित पवार यांनी सांगितले राज्यातील 10000 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी, एक विशिष्ट योजना राबविण्यात येणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरण व हवामान बदलासाठी तब्बल 245 कोटी रुपये वन विभागाला 250 कोटी रुपये तर मृदा आणि संवर्धन विभागाला 4 हजार 287 कोटी रुपये एवढा निधी प्रस्तावित ठेवण्यात आला आहे. मित्रांनो 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचा अंतरिम बजेट शासनाकडून मांडण्यात आले आहे. निवडणुका येत आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते काही कालावधीच्या खर्चाच्या तरतुदीसाठी ही एक केलेली तरतूद असते. याच बजेटमध्ये एक मोठी घोषणा देखील करण्यात आले आहे. मागील त्याला कृषी सौर पंप या माध्यमातून सर्वांसमोर एक प्रश्न उपस्थित झाला आहे. की योजना कोणाला मिळणार लाभार्थी कोण पात्र असणार. प्रत्येकाला सोलर दिले जाणार का? असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेले आहे.

या सर्व गोष्टी या ब्लॉगमध्ये आपण समजून घेणार आहोत. अंतरिम बजेट हे शासनाकडून जसं पाहिजे तसंच शासनाकडून सादर करण्यात आला आहेत. मोठमोठ्या घोषणा देखील झाले आहेत. अंगणवाडीच्या ज्या काही पाणीपुरवठा योजना आहेत. त्या देखील सोलर साठी योजना आखण्यात आली आहे.

शासनाने 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, उद्योजक, व्यावसायिक, महिलावर्ग, शेतकरी वर्ग, व्यापारी अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे व विकास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे अजून पर्यंत वीज कनेक्शन नाही. अशा शेतकऱ्यांना ही योजना फायदेशीर आहे. व शासन अशा शेतकऱ्यांनाच प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची योजना सुरू करण्याबाबत, माहिती दिली त्याचं नाव रूफ टॉप सोलर योजना आहे.

या योजनेचे उद्देश योजनेचे फायदे, अर्ज कुठे करायचा अर्ज, कसा करायचा, योजनेची पात्रता काय आहे. याची सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर, संपूर्ण ब्लॉग वाचकांनी वाचावा तुम्हाला फायदा होईल.

या आधी राज्यात एकूण किती सौर कृषी पंप बसविले जाणार आहेत.

2021 मध्ये पंतप्रधान सौर कृषी पंप योजना लागू केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या, बजेटमध्ये पीएम कुसुम योजना अंतर्गत 1 लाख कृषी पंप बसवले जाणार असल्याचे उद्दिष्ट ठेवले.

या योजनेचे उद्देश कोणते?

उन्हाळ्यात सध्याची स्थिती पाहता पिकांना पाणी देणे. हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे तसेच विजेवर लोड आल्यामुळे देखील, विजेचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचे हाल होताना दिसत आहेत. यासाठी शासनाने मागील त्याला सौर पंप ही घोषणा केली आहे. व त्यांना खूप मदत होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांचा सर्व अडचणी जाणून घेऊन, ज्या परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिन झालेला आहे ते बघून, सोलर पंप बसविण्यासाठी चे तयारी शासनाने दर्शवली आहे. शेतकऱ्यांना विज बिल भरावे लागणार नाही. अशी ही योजना आहे. मुख्य उद्देश म्हणजे यादी शेतकऱ्यांना रात्रीची वीज उपलब्ध होत होती. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. व शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. सौर पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे.

सौर कृषी पंपाची गरज :

राज्यात सध्या जी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये लाईटचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळते. व त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न उद्भवत असतो. तसेच शेतकऱ्यांना लाईट बिल हे जास्त प्रमाणात येत असल्यामुळे, त्यांच्या अवाक्य बाहेर असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लाईट कट किंवा शासनाकडून तोडली जाते. शेतकऱ्यांना या योजनेमुळे लाईट बिल कमी येणार. व सोलर बसवल्यामुळे लाईटीवरचा खर्च देखील कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सौरव कृषी पंप बसविणे गरजेचे ठरले आहे.

सौर ऊर्जेचे फायदे :

  • सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
  • कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे.
  • कोणत्याही शेतकऱ्याला विज बिल भरावे लागणार नाही.

योजनेसाठी पात्र लाभार्थी कसे ठरणार :

  • सौर कृषी पंप योजना 2024 चे पात्र लाभार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी यास पात्र राहील.

अर्ज कोठे करावा :

  • कृषी सर्व सौर पंप योजने चे अंमलबजावणी शासनाने जाहीर केलेले असले, तरी अधिकृतरित्या सर्व माहिती लवकरच जाहीर होईल.

वेबसाईट :

  • सौर पंप योजनेत फॉर्म भरण्यासाठी आपण ऑफलाइन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतींचा वापर करू शकता.
  • शेतकऱ्यांना ऑफलाइन फॉर्म भरावयाचा असेल तर आपल्या लगतच्या कृषी कार्यालयास किंवा ग्रामपंचायत मध्ये चौकशी करावी.
  • मुख्यमंत्री सोलर पंप योजना म्हणजेच सध्या चालू असलेले वेबसाईट. खालील प्रमाणे :
  • Https://www.mahadiscom.in/solar/howtoavail_mr.html
  • या वेबसाईटला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

अशाच प्रकारे, शेती विषयक माहिती, नवीन योजना, शासकीय पातळीवर होणारे निर्णय, केंद्र व राज्य शासन योजना, शेती विषयक मार्गदर्शन, शेतीपूरक उद्योग, शेतीतील अडचणी, शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, चालू घडामोडी, शेती शिक्षण, अशा बऱ्याच गोष्टींवर अभ्यास व चर्चा आपल्या ग्रुपला बघायला मिळतील. खालील बटनावर क्लिक करा. व आमच्या ग्रुपला ॲड व्हा. येथे क्लिक करा.

 

Leave a Comment