मागेल त्याला शेततळे योजना 2024-25 पहा काय आहे योजना.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासन व केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते. या योजनेच प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य शासन करीत, असते. या सर्व योजनांचा विचार करता, “मागेल त्याला शेततळे” हे अत्यंत महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे कोरडवाहू जमिनी ह्या जास्त प्रमाणात ओलिताखाली येत आहेत. व त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची ज्या आर्थिक परिस्थिती विदारक झाले आहे.

“मागेल त्याला शेततळे” या योजनेसाठी पात्र असणारे, शेतकऱ्यांसाठी शेततळे खोदकाम करण्यासाठी व त्यासाठीचे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 75 हजार रुपये दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. “मागेल त्याला शेततळे” या योजनेला राज्य सरकारच्या माध्यमातून अजून वाढीव 20 कोटी रुपये वाढीव मंजूर करण्यात आले आहेत.

कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी बळीराजा आहे. त्यास या योजनेमुळे आर्थिक मदत व परिस्थिती ही सुधारणार आहे. आपण या ब्लॉगमध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेसंदर्भात सखोल अशी माहिती घेणार आहोत. चला तर शेतकरी मित्रांनो आपण या योजनेची माहिती घेऊयात. मित्रांनो शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे वाढ करण्यासाठी, किंवा पिके जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यातल्या त्यात कोरडवाहू शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी पिके घ्यायचा असतील तर, त्यांना पाणीटंचाई होते. अशा समस्या निर्माण होतात. राज्यातील काही भागांमध्ये शेत जमिनीवर विहिरी सुद्धा नसतात. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर, विदर्भ व मराठवाड्याची परिस्थिती ही वेगळी असल्याचे चित्र दिसून येते. त्यामध्ये खानदेश मधील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमधील देखील परिस्थिती खूप बिकट आहे. या भागातील म्हणजेच मराठवाडा असो विदर्भ असो येथील शेती ही फक्त पावसावर अवलंबून असते. त्याचमुळे मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे ठरेल यात शंका नाही.

माझ्या शेतकरी मित्रांनो, सध्या शेती करायचं म्हटले तर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असणे, खूप गरजेचे आहे. पण हे पाणी अलीकडच्या काळात आपल्याकडे, जास्त करून वापरण्यात येते ते म्हणजे विहीर आणि बोरवेल मधून. व ज्या ठिकाणी विहिरी व बोरवेल ला पाणी लागत नाही अशा ठिकाणी या योजनेतील शेततळे उपयोगात येत असते. व या शेततळ्यामुळे जी कोरडवाहू शेती पिकाची जमीन असून, देखील ती जमीन ओलिताखाली येत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे. व त्यांच्या उत्पन्नात ही वाढ होणार आहे. ही वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार असणारे नागरिकांना आत्महत्या कमी होण्यास मदत होणार आहे. जर का ओरडवाहू शेतीला पाण्याची सुविधा जर, उपलब्ध झाले असते तर, राज्यातील बहुतांश जमिनी या ओली त्याखाली येणार आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ही सुधारेल. जर महाराष्ट्र राज्याचा आर्थिक विकास दर झाला तर, देशाच्या आर्थिक परिस्थितीला सुधारणा होत जाईल. व देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे ही योजना मागेल त्याला शेततळे लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे. या योजनेची अंमलबजावणी करीत असताना शासन चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा फायदा तुम्ही वैयक्तिक हो घेऊ शकता. किंवा सामुदायिक स्वरूपात सुद्धा घेऊ शकता. जर का या योजनेचा तुम्हाला सामुदायिक फायदा घ्यायचा असेल, तर 100 रुपयांचा पेपर वरती अर्ज करावा लागेल. अशा शेतकऱ्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. पण त्या शेतकऱ्यांना आपले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. जो कोणी लाभार्थी आहे त्यांनी यापूर्वी इतर, कोणत्याही शासकीय योजना चा व शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा. जर का घेतला असेल तर, त्यांना या योजनेचा लाभ कधीही मिळणार नाही. त्याचप्रमाणे त्यांची जमिनीची तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. व गेल्या पाच वर्षात 50 टक्के कमी पेक्षा कमी घोषित झालेले असावी. मागेल त्याला शेततळे ही योजना 9 फेब्रुवारी 2016 रोजी चालू करण्यात आली.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

शेतकरी मित्रांनो, जर का तुम्हाला मागेल त्याला शेततळे या योजनेचा अर्ज करून लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला खालीलपैकी कागदपत्रे शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.

कागदपत्रे खालील प्रमाणे :

 • लाभार्थ्याचा जातीचा दाखला लाभार्थ्यांचा 7/12 उतारा शेतकऱ्याकडे स्वतःचा 8 अ असणे गरजेचे आहे.
 • लाभार्थी हात जर आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असेल तर, कुटुंब वारसा दाखला आवश्यक आहे.
 • स्वतःच्या सहीने अर्जदाराने भरलेला अर्ज असणे गरजेचे आहे.
 • लाभार्थ्याच्या आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अटी खालील प्रमाणे :

 1. शेतकरी मित्रांनो, शासनाने नेमणूक केलेले कृषी सेवक व कृषी सहाय्यक यांनी जी जागा शेततळ्यासाठी राखीव किंवा निश्चित केलेले असते. तुम्हाला शेततळे बांधणे बंधनकारक असते.
 2. या योजनेअंतर्गत तुम्हाला काम होण्याच्या अगोदर शासन तुम्हाला कोणतीही रक्कम देणार नाही.
 3. जमिनीवर शेततळ्याच्या बांधावर किंवा ज्या ठिकाणाहून शेततळ्यात पाणी आणणार आहे. अशा पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी ज्या काही स्थानिक वनस्पती आहेत त्यांची लागवड करणे महत्त्वाचे आहे.
 4. जे नवीन शेततळे निर्माण केले जाणार आहे त्याची स्वच्छतेचे जबाबदारी व दुरुस्तीची जबाबदारी शेततळ्याच्या मालकाकडे दिली जाणार आहे.
 5. पावसाळ्याच्या काळात तळ्यात गाळ वाहून येणार नाही किंवा गाळ तेथे साचून राहणार नाही याची व्यवस्था लाभार्थ्याने करावी लागणार आहे.
 6. सातबारा उताऱ्यावर लाभार्थ्याने नोंद घेणे बंधनकारक आहे.
 7. ज्या आकारमानाने शेततळे मंजूर झाले आहे तसेच बनवणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.

मागेल त्याला शेततळे या योजनेचा अर्ज कसा करावा?

शेतकरी मित्रांनो, राज्यात शासनाच्या वतीने राबवण्यात येत असणाऱ्या योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. मागेल त्याला शेततळे या योजनेचे जे लक्ष आहे त्याच्यापेक्षा अर्ज जर, जास्त प्राप्त झाले तर शासन लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड करणार आहे. व या योजने मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड होणार आहे. त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस (sms) आल्यानंतर त्याचे काम करण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे. तुमच्या शेतकऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाचे कर्मचारी अधिकारी तुमच्या शेततळ्याचे पाहणी करण्यासाठी येऊन शासनाच्या वतीने जी काही अनुदानाची रक्कम असेल ती लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते.

शासनाकडून मागील त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळे बांधण्यासाठी अजून रक्कम वाढवले जाऊ शकते. आत्ताची पन्नास हजार इतके अनुदान मिळत आहे.

खालील वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता :

https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

अधिक माहितीसाठी :

योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. ही योजना चालू झाल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात कोरडवाहू शेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. व ज्या भागात पावसाचे प्रमाण अत्यंत आहे. अशा भागात शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्याचप्रमाणे कोरडवाहू शेतजमीने हल्लीच्या काळात बऱ्यापैकी उनिताखाली येत आहेत. व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. व कोरडवाहू शेतजमीन असल्यामुळे, तेथील शेतकरी शेततळे होऊ शकत नाहीत. या शेतकऱ्यांना मोठा दिलासा शासनाच्या मार्फत दिला जात आहे. व ग्रामीण भागात या योजनेला खूप महत्त्व चे स्थान प्राप्त झाले आहे. अधिक माहितीसाठी 18001208040 टोल फ्री नंबर वर माहिती विचारू शकता.

मागेल त्याला शेततळे या योजनेतून प्लास्टिक अनुदान कशा स्वरूपात मिळते?

 • 15×15×3 मी 50% अनुदानानुसार 28276 रु मिळतील.
 • 20×25×3 मी 50% अनुदानानुसार 31599 रु मिळतील.
 • 20×20×3 मी 50% अनुदानानुसार 41219 रु मिळतील.

विविध प्रकारच्या योजना.विमा योजना शासन निर्णय, निधी, कृषी विषयक प्रकल्प सध्या चालू असलेल्या योजनांची माहिती, कृषी विषयक नोकरी भरती, शासनाचे अनुदान प्रकल्प, राज्यातील व देशातील चालू घडामोडी, कृषी संलग्न आलेले नवीन GR, कृषी सल्लागार, हवामान अंदाज, फळबाग, तसेच प्रत्येक हंगामातील पिकानविषयी मार्गदर्शन या कृषि योद्धा ग्रुप वर भेटणार आहे.  

 

 

 

Leave a Comment