रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना शासन देणार 1 लाख 1 हजार रुपये जाणून घ्या.

LEK LADAKI YOJANA 2024 :

राज्याती 1 एप्रिल 2023 पासून, ज्या मुलींचा जन्म झाला आहे. आशा मुलींना  “लेक लाडकी” या योजनेअंतर्गत शासन 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत करणार आहे. लेक लाडकी ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी, अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने एक महत्त्वाचे योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आणले आहे. त्यामध्ये मुलींसाठी एक महत्त्वाची अशी योजना मानली जात आहे. तर आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर रित्या, ती योजना काय आहे. ते समजून घेणार आहोत.

“लेक लाडकी” या योजनेचा नक्की लाभ कोणाला होणार आहे, या योजनेचा अर्ज कुठे भरावा, या योजनेचा अर्ज कसा भरायचा, या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहेत.

या योजनेत साठी पात्रता काय आहे?

 • राज्य शासनाचे लेक लाडकी या योजनेचा लाभ हा पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना दिला जाणार आहे.
 • शासनाकडून, पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना त्यांच्या, मुलींना जन्मानंतर 5 हजार रुपये व पुढे इयत्ता पहिली मध्ये 6 हजार रुपये व सातवी मध्ये 7 हजार रुपये त्याचप्रमाणे, अकरावी मध्ये 8 हजार रुपये शासन अनुदान देणार आहे.
 • व त्यानंतर, जे लाभार्थी मुलगी तिचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला शासन 75 हजार रुपये रोख स्वरूपात देईल.
 • अशाप्रकारे, लेक लाडकी या योजनेतून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 1 लाख 1 हजार रुपये शासन देणार आहे.
 • महाराष्ट्रातील जवळपास, अडीच लाख मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. असे सांगितले गेले आहे.

लेक लाडकी या योजनेसाठी निवड कशी केली जाईल :

 • सर्वप्रथम, ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिका असणाऱ्यां, कुटुंबांना 1 एप्रिल 2023 पासून त्यानंतर, जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहणार आहे. व एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास, त्या कुटुंबातील मुलीला ही योजना लागू राहील.
 • त्याचप्रमाणे, पहिलं आपत्य झाल्यास व तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी, आई वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
 • त्याचप्रमाणे, दुसऱ्या प्रसुतीवेळी जर, जुळे आपत्य जन्माला आले, असल्यास एक मुलगी व दोन्ही मुलींचा या योजनेमध्ये समावेश होईल. त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे, त्यांच्या आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
 • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे. त्याचप्रमाणे, नंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना स्वतंत्र लागू राहील.
 • लेक लाडकी या योजनेसाठी, लाभार्थ्याचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
 • त्याचबरोबर, लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबा तील, लाभार्थ्याचे बँक खाते हे महाराष्ट्रातील बँकेमध्ये असणे आवश्यक आहे.
 • लेक लाडकी या योजनेतील लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे जवळपास 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.

लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे जोडावीत :

 • पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील, लाभार्थ्याचा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
 • लेक लाडकी या योजनेतील, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. वर्षाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे.
 • लेक लाडकी या योजनेतील लाभार्थ्याक्या पालकांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्याच्या बँकेच्या पासबुकच्या, पहिल्या पानाची झेरॉक्स आवश्यक आहे.
 • लेक लाडकी या योजनेतील, लाभार्थ्याच्या रेशन कार्ड किंवा पिवळे व केसरी कार्डधारकांची साक्षांकित प्रती आवश्यक आहेत.
 • लाभार्थ्याच्या पालकांचे मतदान ओळखपत्र आवश्यक आहे.
 • लाभार्थ्यांच्या कुटुंबातील नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्जाचा नमुना पुढीलप्रमाणे :

येथे क्लिक करा.

 • लेक लाडकी या योजनेसाठी, तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे.
 • त्याचप्रमाणे, अर्जाचा नमुना देखील खालचा फोटोमध्ये तुम्हाला दिसणार आहे. याचा फॉरमॅट अर्ज करायचा आहे.
 • त्याचप्रमाणे, लेक लाडकी या योजनेसाठी शासन निर्णय हा अहवाल देण्यात आला आहे.
 • त्याचप्रमाणे, एका साध्या कागदावर देखील तुम्ही अर्ज करू शकता.
 • त्यामध्ये, तुमचे वैयक्तिक माहिती, घराच्या पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर व मुलींची माहिती बँक खात्यात ची माहिती, व ही योजना कोणत्या टप्प्यातील लाभार्थी अर्ज केला आहे.
 • ते लिहायचे आहे. व तारीख आणि ठिकाण लिहून सही करून, अर्ज सादर करायचा आहे.
 • लेक लाडकी या योजनेचा अर्ज लिहून झाल्यानंतर, तो अंगणवाडी सेविकांकडे द्यावा. व त्याचे पोहोच पावती अंगणवाडी सेविकांकडून घ्यावी.

लेक लाडकी या योजनेतील लाभार्थ्यांची निवड कशी होणार :

 • तर, मित्रांनो या योजनेचा पिवळ्या व तिसरी शिधापत्रिकाधारकांना, कुटुंबामधील एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर, जन्माला येणाऱ्या एक व दोन मुलींना ही योजना लागू राहील. व एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास, त्यामधील एका मुलीला ही योजना लागू राहील.
 • लेक लाडकी या योजनेतील, पहिल्या आपत्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करत असताना, वडील किंवा आईने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे, आवश्यक आहे. बंधनकारक आहे.
 • त्याचप्रमाणे, दुसऱ्या परिषदेच्या वेळी जुळी आपत्ती जन्मल्यास, एक मुलगी किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. पण त्यानंतर वडील किंवा आईने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
 • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा किंवा एक मुलगी आहे. तसेच त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलीस स्वतंत्र लेक लाडकी या योजनेसाठी पात्र असेल.
 • लेक लाडकी या योजनेसाठी, लाभार्थ्याचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
 • लेक लाडकी या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जवळपास 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.

लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे :

 • या योजनेतील लाभार्थ्याचा जन्माचा दाखला.
 • लेक लाडकी या कुटुंबातील प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला जो की, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावा.
 • लेक लाडकी या योजनेच्या पालकांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
 • या योजनेतील लाभार्थ्याचे बँक पासबुक चे पहिल्या पानाची झेरॉक्स काढावी व सादर करावी.
 • लाभार्थ्याचे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
 • लेक लाडकी या योजनेतील, पिवळे अथवा रेस केसरी रेशन कार्ड चे झेरॉक्स प्रत असावी.
 • लाभार्थ्याच्या शाळेचा दाखला असावा.
 • लेक लाडकी या योजनेत पात्र राहण्यासाठी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून, त्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

तर तुमच्या मनात असा प्रश्न उद्भवला असेल की अर्ज केल्यानंतर पुढे काय होणार. तर पहा :

 • योजनेसाठी, अंगणवाडी सेविकांकडे अर्ज व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेऊन, अंगणवाडी सेविका त्यांची नोंदणी शासनाच्या, ऑनलाईन वेबसाईटवर किंवा पोर्टलवर करायचे आहे.
 • व त्याचबरोबर, तो अर्ज त्या संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. पुढील अंतिम मंजुरी हे महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे, पाठवायचा आहे. त्याचप्रमाणे, शासनाचे अधिकारी या लाभार्थ्यांना 2 महिन्याच्या आत त्यांच्या अर्जावर कारवाई पूर्ण करून देतील.
 • त्याचप्रमाणे ,लेक लाडकी या योजनेमध्ये लाभार्थी निश्चित झाला की, राज्य शासनामार्फत जो लाभ रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. तो त्यांच्या थेट बँकेमध्ये जमा केला जाणार आहे.

राज्यातील रेशन कार्डधारक हे गरीब नागरिक असतात. त्यामुळे त्यांना हे कार्ड धान्य पुरवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. त्याचप्रमाणे, आता शासनाच्या जवळपास सगळ्या योजनांमध्ये, हे एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या घटकातील लोकांना हे एक महत्त्वपूर्ण योजना याद्वारे राबविल्या जातात. त्यामध्ये वर्तमान मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील नागरिकांसाठी, असा वेगवेगळ्या योजना राबवत असतात. त्याचप्रमाणे देशात व राज्यात लोकसभा निवडणुका येऊन ठेपले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता राज्य सरकार गोरगरिबांसाठी अशा अनेक धडाकेबाज योजना राबवत आहे. राज्यामध्ये जवळपास हे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील विविध नागरिकांसाठी, किंवा महिलांसाठी विविध योजना सुरू केले आहेत.

त्याचप्रमाणे, महिलांसाठी राज्य शासनाने आत्ता सुरू करण्यात आलेले. हे महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी ही योजना होय. लेक लाडकी या योजनेसाठी, राज्य शासनाने तब्बल 19 कोटी 70 लाख रुपये इतका निधी वितरित केला आहे. व त्या नदीला मान्यताही दिली आहे.

राज्यातील हा निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आयुक्त नवी मुंबई यांच्यामार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे. व राज्यातील 36 जिल्ह्यांची निवड यासाठी करण्यात आले आहे. ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून, राबविले जात असल्यामुळे, राज्यस्तरावर त्याची नियोजन अधोरेखित केले आहे. व ती योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कशी पोहोचवता येईल. हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम चालू आहे. अशा योजनांमध्ये तुम्ही लाभ कसा घेता येईल. याबद्दल आपण या लेखांमध्ये समजून घेतले आहे.

तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये, तुम्ही या लेक लाडकी योजने संदर्भात चौकशी करू शकता. त्याची माहिती सर्व जाणून घेऊ शकता. शासनाचे अधिकारी तुम्हाला सर्व माहिती सांगतील किंवा जवळच्या अंगणवाडी सेविकांना सुद्धा तुम्ही भेटू शकता. त्यांच्याकडूनही तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

अशाच प्रकारे, तुम्हाला राज्यातील विविध योजनांची माहिती समाजातील विविध घटकांवर सखोल व पारदर्शक माहिती शेतकरी वर्ग, सर्वसामान्य नागरिक यांवर शासन निर्णय आपल्याला आमच्या ग्रुप वर बघायला मिळेल. आमच्या ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी, खालील फोटोवर क्लिक करा.