अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा मोफत वीज मिळणार असा करा अर्ज.

rooftop solar 2024 :

अर्थसंकल्पीय बजेट 2024-25 मध्ये निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पीय बजेट देशाच्या पार्लमेंटमध्ये सादर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो सादर केला. या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री सीतारामन यांनी एक महत्त्व ची घोषणा केली. निर्मला सीताराम यांनी केलेल्या घोषणेचा देशातील नागरिकांवर मोठा की फायदेशीर फायदा होणार आहे. रूप-टॉप सोलर या योजनेद्वारे लाभार्थ्यांना वर्षाचे अठरा हजार रुपयांची वीज ही मोफत मिळणार आहे. सरकारचा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय झाला आहे.  तो म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत महिन्याला 300 युनिट मोफत वीज शासन देणार आहे.

पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत भारतातील 1 कोटी घरांना 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांचे वर्षाकाठी 15000 ते 18 हजार रुपयांची बचत होणार आहे. या योजनेचे घोषणा भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 मध्ये केली. गरीब व मध्यमवर्गीय लोकांना या अंतर्गत छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार, असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांना त्यामुळे विज बिल भरण्यापासून काही सा दीलासा मिळणार आहे. व ते लोक जी जास्त झालेले वीज आहे. ती वीज दुसऱ्यांना विकू शकणार आहेत. 2020 पर्यंत या योजनेअंतर्गत 40 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू केली. व या देशभरात या योजनेअंतर्गत एक कोटी घराणवर रूट टॉप सोलर बसवले जाणार आहेत.

तर, मित्रांनो ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियामध्ये 1 पोस्ट पब्लिश केले आहे. त्या पोस्टमध्ये असे सांगितले आहे. की जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते, आज आयोध्यातील प्रतिष्ठापनाच्या शुभमुहूर्तावर भारतातील लोकांच्या घराच्या छतावर, स्वतःची सौर रूफ टॉप यंत्रणा असावे. हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. आमच्या सरकारने अयोध्येहून परतल्यानंतर पहिला निर्णय घेतला की, 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसवण्याची लक्ष घेऊन, पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू करणार. गरीब आणि मध्यमवर्ग यांचे विज बिल तर, कमी होईलच पण क्षेत्रात भारत स्वावलंबी पण होईल.

रूफ टॉप सोलर पॅनल कशाला म्हणतात?

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर बसवले जाणार आहे. सोलर प्लेट्स बसवण्यात येणार आहेत. म्हणजेच काय तर, सुरेखरणांमधून जी ऊर्जा शोषून घेऊन वीज निर्मिती होते. त्यालाच रूट ऑफ सोलर असे म्हणतात. पॅनल मध्ये फोटो होल्टेज सेल अंगीकृत केलेले असते. जे के सौरऊर्जेला विजय मध्ये रूपांतरीत करीत असते. ही वीज म्हणजे पावर ग्रीड मधून येणारे विजेप्रमाणेच काम करत असते.

भारतातील गोरगरीब आर्थिक दृष्ट्या कमकुवत या लोकांच्या घरावर हे रूफ टॉप सोलर बसविण्यात येणार आहेत : 

देशातील दुर्बल घटकांना व आर्थिक दृष्ट्या कमी असणाऱ्या लोकांना रूफ टॉप सोलर बसविले जाणार आहेत. त्यामुळे काय होईल की त्यांच्या स्वतःच्या विजेच्या गरजा तर पूर्ण होणारच, पण जे अतिरिक्त होणारे वीज ती देखील त्यांना विकता येईल. व त्यातूनही त्यांना पैसे कमवण्याचे मार्ग खुले होतील. व पुढे ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मोहिमेद्वारे लोकांना जोडण्याची विनंती केली.

सौर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येतो :

सौर पॅनल मधून वीज निर्मिती करण्यासाठी वीज निर्मितीची किंमत पॅनलच्या मॉडेल व इन्व्हर्टर या दोन्हीवर अवलंबून असते.एक किलो वॅट सोलर पॅनल बसविण्यासाठी अंदाजे जवळजवळ 45 ते 85 हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो. याशिवाय बॅटरीचाही खर्च असतो. त्याचप्रमाणे 5 किलोमीटर सोलर पॅनल बसवण्यासाठी 2.5 लाख ते 3.25 लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. विज बिलाची किंमत तुम्ही जर पाहिली तर तुमचे वीज बिल पाच सहा वर्षांनी झिरो होईल. कारण तुमचा संपूर्ण खर्च 5-6 वर्षात वसूल होऊन जाईल या योजनेत.

सौर पॅनल प्रणालीचे फायदे व या योजनेचे फायदे काय आहेत ते पहा : 

  • या सोलर पॅनल उभारण्यासाठी वेगळ्या जागेची गरज नाही.
  • ते घराच्या वरती टांगता येतात.
  • सोलर पॅनल सिस्टीम च्या मदतीने तुम्ही घरी बसून विजेची निर्मिती करू शकता.
  • पावर ग्रिड मधून मिळणाऱ्या विजेची तुलना केली.
  • तर ते स्वस्त आणि फायद्याचे आहे. सरकार सौर पॅनल साठी वेळोवेळी अनुदान देत अस.
  • ज्यामुळे ते खरेदी करणं नागरिकांना सोपे जाते.
  • सोलर पॅनल वेळोवेळी स्वच्छ करावे लागते. कारण सूर्यप्रकाश पॅनलवर व्यवस्थित पडेल.
  • या सोलर पॅनल मुळेकोणतेही, प्रदूषण होत नाही. हरितगृह वायू उत्सर्जनास घट होते. व पर्यावरणाचे सुद्धा संरक्षण होते.
  • रूप स्टॉप सोलर या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला 40 टक्क्यांनी अनुदान देत आहे.
  • सोलर पॅनल चे जवळपास 25 वर्ष आयुष्य असते. 25 वर्षात तुम्हाला कोणतीही दुरुस्ती करायची गरज नाही

चालू मध्ये सरकार सौरऊर्जेची संबंधित काही योजना राबवत आहे. त्यामध्ये नॅशनल रूफटॉप स्कीम चालू आहे. या योजनेत तुम्हाला तुमच्या छतावर सौर पॅनल बसवायचे असेल तर, 3 किलो वॅट क्षमतेचे सौर पॅनल बसवण्यावर सरकार तुम्हाला 40 टक्के अनुदान देत. तुम्ही आठ-दहा किलोवॅटचे सौर पॅनल बसविल्यावर शासन तुम्हाला तब्बल वीस टक्के सबसिडी देणार आहे. या योजनेअंतर्गत नवीन ऊर्जा मंत्रालय वीज वितरकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची निवड करत असते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा : 

https://solarrooftop.gov.in/

रुफ सोलर योजनेचा दुसरा टप्पा अलीकडेच 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे. तर या कार्यक्रमांमध्ये सामान्य श्रेणीतील राज्यांसाठी 3 किलो वॅट क्षमता असलेल्या पॅनल साठी 14588 रु प्रति किलो वॅट असे, अनुदान दिले जाणार आहे. तर संबंधित मंत्री आर के सिंग असे म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमास पूर्ण करण्यासाठी 11814 रुपये खर्च येणार आहे. व त्यानुसार तो खर्चही केला जाईल. यामध्ये 60600 रुपयांचे केंद्रीय आर्थिक सहाय्य वितरण कंपन्यांना जवळपास 4985 कोटी रुपये प्रोत्साहन समाविष्ट केले गेले आहे.

सध्या भारतात 10407 मेगावॅट विजेचे उत्पादन केले जाते :

रूफ टोप सोलर स्कीम फेज 2 या अंतर्गत 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत 2651 मेगावॅट क्षमतेचे रूप टॉप सोलर बसविण्यात येत होते. त्यानुसार केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी अलीकडे सांगितले होते, की छतावरील सौर कार्यक्रमाच्या दोन्ही टप्प्यांमधून 10407 मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे.

भारतातील कोणते राज्य रूफ टॉप मध्ये आघाडीवर आहे :

गुजरात हे राज्य रूफटोप सोलर मध्ये आघाडीवर आहे. या प्रोग्राम मध्ये दुसऱ्या टप्प्यात सोलर बसवण्यात गुजरात अव्वल आहे. गुजरातमध्ये जवळपास 1956 मेगाव्यात विजेचे उत्पादन सुरू झाले. व त्याचे एकूण साठवण्याची क्षमता ही 3174 मेगावॅट आहे. तर दुसऱ्या टप्प्यात वीज उत्पादनात भारतातील केरळ राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर येते. केरळमध्ये आत्तापर्यंत 211 मेगावॅट एवढी वीज छतावर तयार केली जाते. व या दोघांच्या बाबतीत विचार केला तर, महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 117 मेगावॅट वीज छतावरून उपलब्ध होऊ लागले आहे.

शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना शासन निर्णय. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. फळबाग.तसेच प्रत्येक हंगामातील पिकानविषयी मार्गदर्शन या कृषि योद्धा ग्रुप वर भेटणार आहे.  

Leave a Comment